सर्वसामान्यांचे आशास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:11+5:302021-09-18T04:29:11+5:30
सुहासनाना शिंदे यांची राजकीय कारकीर्द सन २००७च्या पंचायत समिती निवडणुकीपासून सुरू झाली. २०१२ मध्ये काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद निवडणूक जिंकली. ...

सर्वसामान्यांचे आशास्थान
सुहासनाना शिंदे यांची राजकीय कारकीर्द सन २००७च्या पंचायत समिती निवडणुकीपासून सुरू झाली. २०१२ मध्ये काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद निवडणूक जिंकली. यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीस दमदार सुरुवात झाली. यापुढील काळात त्यांनी विविध पदे यशस्वीपणे भुषवित मोठे यश संपादन केले.
सुहासनानांनी जिल्हा परिषद सदस्य असताना खानापूर गटात कोट्यवधी रुपयांची कामे केली. खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न केले. यामुळे त्यांची लोकसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय त्यांची जिल्हा समिती नियोजन समिती सदस्यपदी दोनवेळा निवड झाली.
सध्या लेंगरे जिल्हा परिषद गटात सुहासनाना शिंदे यांनी कायम कार्यरत राहणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. जिल्हा परिषद गटातील कोणाचेही आणि कोणतेही काम नाना तत्परतेने करतात, असा जनमानसात त्यांनी विश्वास निर्माण केला आहे.
खानापूर शहरात २०१६ मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली. त्याचवर्षी झालेल्या निवडणुकीत सुहासनानांनी सत्ता मिळवत नगरपंचायत ताब्यात घेतली. गेल्या पाच वर्षांत सर्व नगरसेवकांना विविध पदांवर काम करण्याची संधी देत नगरपंचायतीचा समतोल राखला. यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. नानांनी खानापूर शहरात विविध माध्यमांतून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून सर्व प्रभागात पारदर्शकपणे कामे केली. सर्व शासकीय योजना नगरसेवक, मुख्याधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने राबवत प्रत्येक स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन करीत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे मिळविली. या कालावधीत त्यांनी माजी पालक मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सहकार्याने विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.
याची पोहोच पावती म्हणून नानांच्या पाठीशी युवकांची मोठी फळी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलकाद्वारे खानापूर घाटमाथा पोस्टरमय केला आहे. लहानथोर मंडळींच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेल्या मा. सुहास (नाना) शिंदे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.
चाैकट सन २००२ मध्ये अजिंक्य उद्योग समूह व दूध डेअरीची स्थापना, गावोगावी दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मिती.
सन २००३ ते २०१० पर्यंत युवकांचे संघटन, सामाजिक उपक्रम राबवून तरुणांना प्रोत्साहित करणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन.
सन २०११ मध्ये विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड.
सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत विजय, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड,
सन २०१३ मध्ये कै. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती,
सन २०१४ मध्ये लोकसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड,
सन २०१६ च्या खानापूर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापन,
सन २०१७ मध्ये खानापूर घाटमाथ्यावरील विविध ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन,
सन २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आमदार अनिल (भाऊ) बाबर यांना पाठिंबा.
सन २०२१ मध्ये जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवड,
कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊन काळात सुहासनानांनी खानापूर घाटमाथ्यावरील प्रत्येक गावात गरजूंना मदत करत उल्लेखनीय कार्य केले. गोरगरीब जनतेसाठी खानापूर येथे त्यांनी डॉ. उदयसिंह हजारे यांच्या सहकार्याने मातोश्री कोविड सेंटरची स्थापना केली होती. याचा लाभ अनेक रुग्णांना झाला. वाढदिवसानिमित्त रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय दोनशे महिलांना घरोघरी उपयोगात येणाऱ्या आटा चक्की सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे.