गुंडप्रवृत्तीला उमेदवारी देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:03+5:302021-02-15T04:23:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विकास आघाडीचे गटनेते विक्रमभाऊ पाटील यांनी विविध ठिकाणी बैठका घेतल्या. यामध्ये ...

Hooliganism will not be nominated | गुंडप्रवृत्तीला उमेदवारी देणार नाही

गुंडप्रवृत्तीला उमेदवारी देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विकास आघाडीचे गटनेते विक्रमभाऊ पाटील यांनी विविध ठिकाणी बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, पालिकेत गुंडांचा आणि भूखंड माफियांचा बाजार झाला आहे. त्यांना शहराच्या विकासाची काही देणे-घेणे नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून आपण पालिकेस लाखो रुपयांचा फंड उपलब्ध केला आहे. त्यातून माझ्या प्रभागातील रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. उपनगरातील बरेच रस्ते अपूर्ण आहेत. अशा रस्त्यांच्या कामाला पालिका निवडणुकीच्या अगोदर प्राधान्य देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

विकास आघाडीतील अंतर्गत असलेल्या मतभेदावर ते म्हणाले, गटातटाचे व स्वार्थाचे राजकारण करणाऱ्यांना विकास आघाडी किंवा भाजपमध्ये स्थान नाही. पालिकेत आता उच्चशिक्षित आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. फक्त डिजिटल पोस्टरवर झळकून गुंडगिरी करणाऱ्या युवा नेत्यांना आमच्या पक्षात स्थान नाही.

एकंदरीत सत्ताधारी विकास आघाडीत भाजप, शिवसेना, कॉँग्रेसचे नगरसेवक एकत्रित आहेत. परंतु गेल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत अंतर्गत गटबाजीने विकासकामाला गती आली नाही. काही प्रभागांतील रस्ते वगळता केलेल्या विकासकामावर पालिकेचे नियंत्रण आणि नियोजन फज्जा उडाला आहे. त्यामुळे विकासकामांचे तीन तेरा वाजले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही, याचीच मनात खंत ठेवून आगामी पालिका निवडणुकीत गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना थारा देणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

चौकट

दारूबंदीसाठी आंदोलन

शहरात दारू, मटका आदी व्यवसायावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न आहे. परंतु याला पालिका सभागृहात साथ मिळत नाही. शहरात दारूबंदी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी काळात शहरातील दारूबंदीसाठी आंदोलन उभे करावे लागेल, असाही सूर विक्रमभाऊ पाटील यांच्या समर्थकांतून निघत आहे.

फोटो - विक्रमभाऊ पाटील फोटो घ्यावा.

Web Title: Hooliganism will not be nominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.