आष्टा येथे महावितरणच्या वतीने महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:28+5:302021-03-13T04:48:28+5:30
आष्टा येथील महावितरणच्या कार्यालयात महिला ग्राहक राधाबाई जोगळेकर यांचा उपकार्यकारी अभियंता विजयकुमार गुरव व निशिकांत पाटील यांनी सत्कार केला. ...

आष्टा येथे महावितरणच्या वतीने महिलांचा सन्मान
आष्टा येथील महावितरणच्या कार्यालयात महिला ग्राहक राधाबाई जोगळेकर यांचा उपकार्यकारी अभियंता विजयकुमार गुरव व निशिकांत पाटील यांनी सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील महावितरण उपविभागीय कार्यालयांमध्ये घरगुती व शेतीपंप लाइट बिलांची थकबाकीवसुली चालू आहे. महिला दिनाचे औचित्य साधून कृषीपर्व योजना-२०२० अंतर्गत कृषीपंपांचे बिल भरून थकबाकी मुक्त झालेल्या महिला ग्राहक राधाबाई गोविंद जोगळेकर यांचा उपकार्यकारी अभियंता विजयकुमार गुरव यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
महिला दिनानिमित्त आष्टा येथील महिला वर्षाराणी जीवनधर पाटील यांचे प्लॉटमधील तारा शिफ्ट करून त्यांना कनेक्शनचे कोटेशन आष्टा-२ चे अभियंता शाहरूख देसाई यांनी मंजूर केले, तर कोरेगाव येथील महावितरण अभियंता नेताजी तिकोडे यांनी फुलाबाई सायाप्पा गावडे (रा. कोरेगाव) यांचे एलटी लाइनचे घरगुती कनेक्शनचे कोटेशन मंजूर केले. यावेळी महावितरण कार्यालय आष्टाचे क्वाॅलिटी कंट्रोल अभियंता श्रवण लांडे, कॉन्ट्रॅक्टर निशिकांत पाटील, गोटखिंडी उपस्थित होते.