भाटवडे पाणी योजनेस जमीन देणाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:17+5:302021-04-04T04:27:17+5:30
फोटो ओळ : भाटवडे (ता. वाळवा) येथे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी देवराज ...

भाटवडे पाणी योजनेस जमीन देणाऱ्यांचा सत्कार
फोटो ओळ : भाटवडे (ता. वाळवा) येथे पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी देवराज पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते.
लोकमत न्युज नेटवर्क
वाटेगाव : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही जाणीव ठेवून भाटवाडे (ता. वाळवा) येथील माजी मुख्याध्यापक सुरेश जाधव, कृष्णदेव जाधव व बाजीराव डंगारणे यांनी स्वमालकीची जागा गावाच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी दिली. यानिमित्त आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
जलसंपदामंत्री जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या भाटवाडे येथे पेयजल योजनेतून मंजूर मिळाली आहे. या योजनेचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार नाईक म्हणाले की, सुरेश जाधव, कृष्णदेव जाधव व बाजीराव डंगारणे यांनी रस्त्याकडेची लाखो रुपये किमतीची जमीन गावासाठी ग्रामपंचायतीला पाण्याची टाकी बांधणे व विहिरीसाठी जागा विनामोबदला दान दिली. त्यांच्या या कार्याचा आदर्श लोकांनी घ्यावा.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राजारबापू दूध संघाचे माजी संचालक हरिश्चंद्र औताडे, राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, उपसरपंच अमोल देवकर, पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण, अशोक देवकर, सुरेश उथळे, प्रकाश पाटील, सुरेश देवकर, दीपक रोकडे, कुमार बल्लाळ, भगवान देवकर, ग्रामसेवक दिलीप पाटील उपस्थित होते.