कडेगाव : भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथील मानद संचालक डॉ. हणमंतराव मोहनराव कदम (वय ६०) यांचे आज, शुक्रवारी (दि. १४) पहाटे ३ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने भारती विद्यापीठ परिवारासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर मूळगावी सोनसळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथे मानद संचालक म्हणून कार्यरत होते.माजी आमदार मोहनराव कदम यांचे ते पुत्र, माजी मंत्री, आमदार विश्वजित कदम यांचे चुलत बंधू व युवा नेते डॉ. जितेश कदम यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:40 IST