आरवडे येथे काेराेना याेद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:53+5:302021-06-23T04:18:53+5:30

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे सिद्धनाथ हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून आरोग्य विभाग, आशा सेविकांसह कोरोना योद्ध्यांचा सत्कार खासदार संजयकाका ...

In honor of Kareena Yeddy at Arwade | आरवडे येथे काेराेना याेद्ध्यांचा सन्मान

आरवडे येथे काेराेना याेद्ध्यांचा सन्मान

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे सिद्धनाथ हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून आरोग्य विभाग, आशा सेविकांसह कोरोना योद्ध्यांचा सत्कार खासदार संजयकाका पाटील व युवा नेते रोहित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रम झाला.

यावेळी मांजर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मांजर्डे, आरवडे, डोर्ली, पुनदी, मोराळे, बलगवडे या गावातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेविका, आशा सेविका व सरपंचाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, कोरोना काळात सामाजिक जबाबदारी समजून काम केले आहे. कठीण प्रसंगात धैर्याने काम कसे करावे. याची प्रेरणा यांच्याकडून मिळते.

युवा नेते रोहित पाटील म्हणाले, कोरोना योद्ध्यांच्या अविरतपणे सुरू असलेल्या कामामुळे आज तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामध्ये आरोग्य विभाग, आशा सेविकांची मोलाची भूमिका आहे.

पंचायत समिती सभापती कमलताई पाटील, युवराज पाटील, प्राचार्य प्रकाश हाके यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉ. नीलेश महांगीरे, विमल पाटील, युवराज पाटील यांच्यासह शिक्षक, सरपंच व मान्यवर उपस्थित होते. योगेश स्वामी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: In honor of Kareena Yeddy at Arwade