सांगली अर्बन बँकेचे संचालक संजय परमणे म्हणाले, सावळज गावात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते गट तट विसरून अपार मेहनत घेत आहेत. यापुढील काळातही या सर्वांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने म्हणाले, कोरोनाचा काळ सर्वांना खडतरीचा गेला. कोरोना संकटामुळे सर्व थरातील आर्थिक घटक अडचणीत आलेले आहेत. शासन आपल्या परीने मदत करत आहे. परंतु संपूर्ण लसीकरण पूर्ण होईपर्यंत आपल्याला सतर्क राहावे लागेल.
यावेळी मनीषा माळी, सरपंच स्वाती पोळ, उपसरपंच संजय थोरात, सिदगोंड पाटील, गणेश पाटील, अनिल थोरात, हेमंत पाटील, बाळासाहेब निकम, राजेंद्र सावळजकर, योगेश पाटील, ऋषिकेश बिरणे, विनोद कोळी आदी उपस्थित होते. संचालक प्रशांत कुलकर्णी प्रास्ताविक केले. संचालक संदीप माळी यांनी आभार मानले.