इस्लामपुरात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:09+5:302021-07-07T04:34:09+5:30
इस्लामपूर : येथील इस्लामपूर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्चना बाबुराव अनुसे या रुग्णाच्या कानातील तीस हजार रुपये किमतीची ...

इस्लामपुरात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
इस्लामपूर : येथील इस्लामपूर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्चना बाबुराव अनुसे या रुग्णाच्या कानातील तीस हजार रुपये किमतीची कर्णफुले रुग्णालयातील सफाई कामगार हेमंत बेले आणि वसंत घेवदे यांनी प्रामाणिकपणे परत करून, अनोख्या माणुसकीचे दर्शन घडविले.
रुग्णालयातील सफाईचे काम करत असताना, हेमंत बेले व वसंत घेवदे यांना ही कर्णफुले सापडली होती. त्यांनी हे दागिने हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांच्याकडे जमा केले. सागर पाटील यांनी त्या रुग्णाचे नातेवाईक बाबुराव धावजी अनुसे यांच्याशी संपर्क साधून, हे दागिने सफाई कामगार हेमंत बेले व वसंत घेवदे यांच्याच हस्ते नातेवाइकांकडे सुपुर्द केले. अनुसे यांनी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सफाई कामगारांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.
फोटो : ०६ इस्लामपूर १
ओळ : इस्लामपूर येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील हेमंत बेले आणि वसंत घेवदे यांनी सापडलेले दागिने बाबुराव अनुसे यांना परत केले. यावेळी सागर पाटील उपस्थित होते.