पोलीस खात्यातून प्रामाणिक समाजसेवा करता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:05+5:302021-02-23T04:41:05+5:30
फोटो ओळ : फोटो शिरटे (ता. वाळवा) येथे शैलजा पाटील, अरुण देसाई यांच्या हस्ते कृष्णत पिंगळे यांचा सत्कार करण्यात ...

पोलीस खात्यातून प्रामाणिक समाजसेवा करता येते
फोटो ओळ : फोटो शिरटे (ता. वाळवा) येथे शैलजा पाटील, अरुण देसाई यांच्या हस्ते कृष्णत पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंभोराजे पवार, गुलाबराव पाटील, विजय काईगंडे, विलास पाटील, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : लोकांना न्याय द्यायचा असेल आणि प्रामाणिक समाजसेवा करायची असेल, तर पोलीस खात्यासारखे दुसरे खाते नाही, असे मत पोलीस उपनिरीक्षक कृष्णत पिंगळे यांनी व्यक्त केले. तसेच गावचे नाव रोशन करावयाचे असेल, तर मुलींना भरपूर शिकवा, असा सल्ला उपस्थित श्रोत्यांना दिला.
शिरटे (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व स्वराज्य सोशल फाउंंडेशन यांंच्;ा वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. वारणा व्हॅलीचे माजी उपाध्यक्ष जगन्नाथ रणदिवे अध्यक्षस्थानी होते. ॲड. विजय काईगंडे, हणमंतराव पाटील, परशुराम देसाई, एम.के. देसाई, पंढरीनाथ पाटील, गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. विजय दाईगंडे, हणमंतराव पाटील, डॉ. पायल पाटील, डॉ. शेखर देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. तलाठी विश्वनाथ भांगे, नामदेव क्षीरसागर, निवास पवार, अनिकेत क्षीरसागर, योगेश तावरे आदींसह डॉक्टर, अंगणवाडीसेविका, आशावर्कर्स यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सरपंच शैलजा पाटील, उपसरपंच अरुण देसाई यांनी स्वागत केले. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. विशाल ऊर्फ शंभोराजे पवार यांनी सूत्रसंचालन केले. रोहित पाटील यांनी आभार मानले.
यावेळी पृथ्वीराज पाटील, श्रीरंग पाटील, विलास पाटील, सागर रणदिवे, हर्षद पवार, विशाल रणदिवे, नामदेव क्षीरसागर, अर्जुन खोत, भास्कर खोत, अभिजित नांगरे, प्रणव पाटील उपस्थित होते.