गृहमंत्र्यांनी केले जिल्हा पोलीस दलाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:56+5:302021-01-19T04:28:56+5:30
सांगली : शेगाव (ता. जत) येथील तब्बल सव्वादोन कोटी रुपयांच्या दरोड्याचा २४ तासात छडा लावून सर्व मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल ...

गृहमंत्र्यांनी केले जिल्हा पोलीस दलाचे कौतुक
सांगली : शेगाव (ता. जत) येथील तब्बल सव्वादोन कोटी रुपयांच्या दरोड्याचा २४ तासात छडा लावून सर्व मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले. याबाबत ट्वीट करत त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.
शेगाव (ता. जत) येथील सराफास सव्वादोन कोटी रुपये किमतीचे सोने देण्यास चाललेला व्यापारी व त्याच्या साथीदाराच्या डोळ्यात चटणी फेकून चार किलो ५३० ग्रॅम वजनाचे सोने पळवून नेण्यात आले होते. एलसीबीसह तीन पथकांनी संयुक्त कारवाई करत २४ तासात पाच जणांना अटक करत शंभर टक्के मुद्देमालही हस्तगत केला होता.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या प्रकरणाचा तातडीने छडा लावला होता. यामुळे सांगली पोलिसांनी अवघ्या २४ तासात चोरी झालेला मुद्देमाल सराफास परत मिळवून दिला. सांगली पोलिसांनी कार्यतत्परतेने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. असे ट्वीट गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.