पेठ येथे जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानांतर्गत अरुणा मुळीक यांना घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:11+5:302021-04-05T04:23:11+5:30
पेठ (ता. वाळवा) येथील अरुणा मुळीक यांना घरकुलाची चावी प्रतीक पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी प्रा. श्यामराव ...

पेठ येथे जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानांतर्गत अरुणा मुळीक यांना घर
पेठ (ता. वाळवा) येथील अरुणा मुळीक यांना घरकुलाची चावी प्रतीक पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी प्रा. श्यामराव पाटील, अतुल पाटील, विजय पाटील, संग्राम पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ (ता. वाळवा) येथील श्रीमती अरुणा रंगराव मुळीक यांना जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाअंतर्गत जयंत घरकुल यांना हक्कच घर मिळाले. या घरकुलांची चावी युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी राजारामबापू बॅँकचे अध्यक्ष श्यामराव पाटील, संग्राम पाटील, अतुल पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, संतोष देशमाने, भागवत पाटील हे उपस्थित होते.
अरुणा मुळीक यांच्या पतीचे ४० वर्षांपूर्वी निधन झाले. शेती नाही घरात कर्ता पुरुष नाही. पोटी एकच मुलगी घेऊन माहेरी आल्या चार घरची धुणेभांडी करून संसाराचा गाडा चालवू लागली. मुलीचे लग्न झाले, पण पुन्हा नियतीने घात केला जावयाचे आकस्मिक निधन झाले तर काही दिवसांत मुलगीसुद्धा अस्थमाने निधन पावली, पुन्हा नातवंडांसह संघर्ष चालू राहिला, अशा परिस्थितीत नातवाला १२वीपर्यंत शिक्षण दिले, रहायला एक छोटंसं दोन खोल्यांचं पण जीर्ण झालेलं घर, कमी जागेमुळे शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता. खूप दिवसांपासून त्या कुटुंबाची घराची मागणी होती. अखेर जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून त्यांना हक्काचा निवारा मिळाला.