कडेगाव येथे वीज बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST2020-12-09T04:22:48+5:302020-12-09T04:22:48+5:30

कोरोना काळातील वीजबिले माफ करून, वाढीव बिले कमी करावीत, कडेगाव परिसरात सुरळीत वीजपुरवठा करावा, शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा ...

Holi of electricity bills at Kadegaon | कडेगाव येथे वीज बिलांची होळी

कडेगाव येथे वीज बिलांची होळी

कोरोना काळातील वीजबिले माफ करून, वाढीव बिले कमी करावीत, कडेगाव परिसरात सुरळीत वीजपुरवठा करावा, शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा सुस्थितीत जोडाव्यात, शेतीपंपाकरिता बंद असलेली नवीन वीज जोडणी पुन्हा सुरू करावी, विजेच्या समस्यांबाबत हेल्पलाईन नंबर सुविधा सुरू करण्यात यावी, कडेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून येथील शेतीपंपांची वीज पूर्वीप्रमाणेच कडेगावला जोडण्यात यावी, या मागण्यांची योग्य दखल घ्यावी. अन्यथा २२ डिसेंबर रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला.

संतोष डांगे, दीपक न्यायनीत, युनूस पटेल, अभिमन्यू वरुटे, जीवन करकटे, विठ्ठल खाडे, शशिकांत रासकर, खाशाबा नायकवडी, राजेंद्र थोरात, प्रकाश शिंदे, खन्ना शेख, युवराज देसाई उपस्थित होते.

फोटो ओळ :

कडेगाव येथे वीज बिलांची होळी करताना शेतकरी व नागरिक.

Web Title: Holi of electricity bills at Kadegaon