शिरढोणमध्ये केंद्राच्या कृषी कायद्यांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:01+5:302021-03-30T04:17:01+5:30

फोटो ओळ : शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे अखिल भारतीय किसान सभेतर्फे शेतकरीविरोधी कृषी विधेयकाची होळी करण्यात आली. शिरढोण : ...

Holi of Centre's agricultural laws in Shirdhon | शिरढोणमध्ये केंद्राच्या कृषी कायद्यांची होळी

शिरढोणमध्ये केंद्राच्या कृषी कायद्यांची होळी

फोटो ओळ :

शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे अखिल भारतीय किसान सभेतर्फे शेतकरीविरोधी कृषी विधेयकाची होळी करण्यात आली.

शिरढोण : शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकरीरोविधी कृषी विधेयकाची होळी करून आंदोलन करण्यात आले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनास १२० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. केंद्र सरकारने या आंदोलनाकडे उपेक्षेने पाहण्याचे धोरण घेतले आहे. तरी केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांना देशव्यापी विरोध व्यक्त करण्यात हे आंदोलन नक्कीच यशस्वी ठरले आहे. आंदोलनाच्या मागण्या अधिक प्रखरपणे केंद्रस्थानी आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिरढोण येथे होळी सणाच्या दिवशी शेतकरीविरोधी तीन कायदे व चार कामगारविरोधी श्रमसंहिता आणि वीज विधेयक यांचे होळीमध्ये दहन करण्यात आले.

यावेळी सागर पाटील, बाळासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, रजनीकांत पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रदीप पाटील, सुनील करगने, प्रमोद सूर्यवंशी, गोरख सूर्यवंशी, धनाजी साळुंखे, लक्ष्मण चौगुले, आनंदराव पाटील उपस्थित होते.

चाैकट

धरणे आंदोलन

शिरढोण येथे सुरू असलेल्या महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा सोमवारी २५ वा दिवस, तर साखळी उपोषणाचा सहावा दिवस होता. फेरसर्व्हे व नव्याने बाधित शेतकऱ्यांच्या निवाडा नोटिसा तातडीने द्या, या मागणीसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत सर्व्हे झालेल्या संपूर्ण बाधित शेतकऱ्यांच्या निवाडा नोटिसा मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय किसान सभेच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे यांनी दिली.

Web Title: Holi of Centre's agricultural laws in Shirdhon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.