थकबाकीदारांचे गाळे ताब्यात घ्या
By Admin | Updated: November 22, 2015 00:03 IST2015-11-21T23:42:53+5:302015-11-22T00:03:38+5:30
संतोष पाटील : प्रशासनाला आदेश, प्रसंगी फेरलिलाव काढण्याचा इशारा

थकबाकीदारांचे गाळे ताब्यात घ्या
सांगली : शहरातील थकबाकीदार गाळेधारकांकडून गाळे ताब्यात घेऊन त्याचा लिलाव काढण्याचे आदेश शनिवारी महापालिका स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी दिले. थकबाकीची निश्चित आकडेवारी पुढील सभेत सादर करण्याचे आदेशही त्यांनी मालमत्ता विभागाला दिले.
स्थायी समितीच्या यापूर्वीच्या सभांमधूनही गाळेधारक, खोकीधारक तसेच मुव्हेबल खोकीधारकांच्या भाडे थकबाकीचा मुद्दा गाजला आहे. महापौरांनीही सिंधी मार्केटसह कर चुकविणाऱ्या गाळेधारकांकडून गाळे ताब्यात घेण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. महापालिका प्रशासनाने शनिवारी सादर केलेल्या आकडेवारीनुसार सांगली शहरातील खोकीधारक, गाळेधारकांकडून ८ कोटी रुपये भाडे येणे असल्याचे दिसून आले. यामध्ये २०० खोकीधारक व मुव्हेबल गाळेधारकांचा समावेश आहे. ही आकडेवारी फुगीर असल्याचे मत काही सदस्यांनी व्यक्त केले. त्यानंतर सभापतींनी फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
आकडे थकबाकीचे
संकुल गाळे थकबाकी
४सिंधी मार्केट ५१ १ लाख २७ हजार
४पेठभाग ६४ १ लाख ६४ हजार
४शिवाजी मंडई ८६ ५ लाख
४राजवाडा चौक १२ ७ लाख ५0 हजार
४शाळा क्र. १ ६ ३ लाख ५0 हजार
४मंगलधाम २0 ८ लाख