शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत खाणाऱ्यांमुळे सरकार पडले, आता पिकवणाऱ्यांमुळेही सरकार पडेल; बच्चू कडू यांची टीका

By शरद जाधव | Updated: August 24, 2023 16:29 IST

...त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले.

सांगली : ऐंशीच्या दशकात कांद्याचे दर वाढल्याने सरकार पडले, वाजपेयी सरकारही याचमुळे पडले. आतापर्यंत खाणाऱ्या वर्गाच्या असंतोषाचा परिणामातून सरकार पडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, अडचणीवर बोलायला सरकार अजिबातच तयार नाही. त्यामुळे आतापर्यंत खाणाऱ्यांच्यामुळे सरकार पडल्याचा अनुभव आहे आता पिकवणाऱ्यांच्यामुळेही सरकार पडू शकते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले.

‘दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानासाठी सांगलीत आलेल्या आ. कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधतान सरकारच्या भूमिकेवर सडकून टिका केली. आ. कडू म्हणाले की, कांदा आणि टोमॅटोच्या दरवाढीवरून सरकारमध्ये निर्णय घेतले जात आहेत. यात डिसेंबरचा विचार करून कांद्यावर लावण्यात आलेला ४० टक्के अतिरिक्त शुल्काची काहीच गरज नव्हती. तरीही शासनाने हा निर्णय घेतलाच असेलतर आता यातून मिळणारे शुल्क कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच द्यावे.

सरकारकडून नेहमीच खाणाऱ्याचाच विचार केला जातो. ७५ वर्षांपासून आपण हीच व्यवस्था पाहत आलो आहे. आजवर कधीही पिकवणाऱ्याचा विचार केला जात नाही. त्यामुळेच आतापर्यंतची सरकारे ही खाणाऱ्या वर्गामुळे पडल्याचा अनुभव आपल्याला आहे. अगदी तसेच आता पिकवणाऱ्यांमुळेही पडू शकते. यासाठी शेतकऱ्यांमध्ये मात्र, जागृती होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची एकजूट राहावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.मुळात कांदा खाल्लाच पाहिजे असे काहीच नाही. कांदा न खाल्ल्याने कोणी मरतही नाही. कांद्याऐवजी लसूण खावा अथवा मुळा खावावा. शासनाकडूनच आता प्रत्येक घटकाला खऱ्या न्यायाची प्रतिक्षा असल्याचेही ते म्हणाले.दरवाढीसाठीही हस्तक्षेप कराआ. बच्चू कडू म्हणाले की, जेव्हाही केव्हा शेतमालाचे दर वाढतात. तेव्हा लगेच शासन त्यामध्ये हस्तक्षेप करते. मात्र, ज्यावेळी त्याच शेतमालाचे दर कमी झाले तर ते वाढवावेत आणि शेतकऱ्यांनाही काहीतरी पदरात पडावे यासाठी शासन काही करताना दिसत नाही. 

 

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरीGovernmentसरकार