कुपवाडमध्ये कंटेनरची खांबास धडक; चालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:31+5:302021-09-10T04:33:31+5:30
कुपवाड : शहरातील मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबास भरधाव कंटेनर चालकाने धडक दिल्याने ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार ...

कुपवाडमध्ये कंटेनरची खांबास धडक; चालकाविरुद्ध गुन्हा
कुपवाड : शहरातील मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबास भरधाव कंटेनर चालकाने धडक दिल्याने ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कुपवाड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. नवनाथ गुलाबराव जगताप (वय ५२, रा. दत्तनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री संशयित नवनाथ जगताप हा कुपवाड एमआयडीसीतून सांगलीकडे भरधाव वेगाने कंटेनर (एमएच १२ एलटी ४६०८) घेऊन जात होता. शहरातील मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबाला जोरदार धडक दिल्याने खांबाचे ३० हजार रुपयाचे नुकसान झाले. याबाबतची तक्रार महावितरणचे कर्मचारी सुनील मोहिते यांनी कुपवाड पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.