उमाजी नाईक यांचा इतिहास शिक्षण प्रवाहात आणावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:07+5:302021-02-06T04:47:07+5:30
नेर्ले : भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी १८५७ च्या उठावाच्या अगोदर क्रांतीची मशाल घेऊन फिरणारे नरवीर राजे उमाजी नाईक होते. ...

उमाजी नाईक यांचा इतिहास शिक्षण प्रवाहात आणावा
नेर्ले : भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी १८५७ च्या उठावाच्या अगोदर क्रांतीची मशाल घेऊन फिरणारे नरवीर राजे उमाजी नाईक होते. ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करणाऱ्या उमाजी नाईक यांचा इतिहास शिक्षण प्रवाहात यायला हवा, असे मत प्रा. विजय लोहार यांनी व्यक्त केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथील रामोशी समाजाच्यावतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच जयसिंग माने, हणमंत चव्हाण, महादेव चव्हाण, कुमार गुरव, आधार फाउंडेशनचे प्रा.अमोल कुंभार, सचिन गवारकर यांची उपस्थिती होती.
लोहार म्हणाले, छत्रपती शिवराय यांच्या संकल्पनेतील स्वराज्य निर्मितीसाठी रामोशी समाजाचे मोठे योगदान आहे. उमाजी नाईक हे भारताच्या स्वतंत्र क्रांतीच्या प्रवाहाचे मुख्य स्रोत आहेत. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यांचा क्रांतिकारक विचार समाजात रुजणे आवश्यक आहे.
यावेळी ओंकार नाईक, विशाल नाईक, विशाल चव्हाण, विवेक नाईक, देवराज मदने, हणमंत चव्हाण, कुमार गुरव, विवेक नाईक, विशाल नाईक आदी उपस्थित होते.