भित्तीपत्रिकेतून उलगडला 'भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:20+5:302021-08-15T04:27:20+5:30

मिरज : मिरजेत डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. या भित्तीपत्रिकेतून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ...

'History of Indian Freedom Struggle' unfolded from the poster | भित्तीपत्रिकेतून उलगडला 'भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास'

भित्तीपत्रिकेतून उलगडला 'भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास'

मिरज : मिरजेत डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात इतिहास विभागातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. या भित्तीपत्रिकेतून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण घटना, व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलने, अनेक व्यक्तींचे कार्यकर्तृत्व, स्वातंत्र्यलढ्यात महिलांचाही मोठा सहभाग, सर्वांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत तेजस्विनी कांबळे, स्नेहल कांबळे, आरती माेरे, गाैरी माळी, प्रांजल जाधव, राधिका जाधव, प्रतीक कांबळे, याेगेश बेडगे, लाेकेश नाईक, वैभव चाैगुले, वैभव पाटील, अतुल कुंभार, प्रथमेश हराळे, धीरज दाभाेळे, प्रथमेश आवटी, पवन पवार, साैरभ नाईक या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रिका तयार केल्या.

भित्तीपत्रिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सराेजिनी नायडू, होमरूल चळवळ, बंगालची फाळणी, अँनी बेझंट, क्रांतिसिंह नाना पाटील, उमाजी नाईक अशा विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यावर व स्वातंत्र्यलढ्यातील विविध घटनांवर प्रकाशझाेत टाकण्यात आला. प्राचार्य डॉ. जे. एल. भोसले यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे उद्घाटन झाले. डॉ. अर्चना जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. एन. पाटील, प्रा. राजू खाेत यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित हाेते.

Web Title: 'History of Indian Freedom Struggle' unfolded from the poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.