हिंगणगाव बुद्रुक, येडे उपाळेत काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:54+5:302021-09-16T04:33:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडेपूर : कडेगाव तालुक्यातील येडे उपाळे येथील काँग्रेसच्या नऊ कार्यकर्त्यांनी तर, हिंगणगाव बुद्रूक येथील ...

Hingangaon Budruk, Yede Upale Congress workers in BJP | हिंगणगाव बुद्रुक, येडे उपाळेत काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये

हिंगणगाव बुद्रुक, येडे उपाळेत काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेपूर : कडेगाव तालुक्यातील येडे उपाळे येथील काँग्रेसच्या नऊ कार्यकर्त्यांनी तर, हिंगणगाव बुद्रूक येथील ३१ कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व कडेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.

कडेगाव नगरपंचायतीमधील भाजपचे नगरसेवक नितीन शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपही तयारीत होती. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय व सन्मानाची वागणूक दिली दिली जाईल, अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली.

तालुक्यात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. कडेगाव नगरपंचायतसह तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने चार जिल्हा परिषद गटांपैकी तीन जागा मिळविल्या, तर आठ पंचायत समिती गणांपैकी सहा जागा मिळविल्या होत्या. आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू आहे.

Web Title: Hingangaon Budruk, Yede Upale Congress workers in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.