हिंदुस्तान पेट्रोलियमतर्फे सक्षम सायकल रॅलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:12+5:302021-02-05T07:25:12+5:30

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सक्षम सायकल रॅलीमध्ये महापौर गीता सुतार, किरण जीवन, किरण वाघमारे, राहुल पाटील आदी सहभागी झाले. लोकमत न्यूज ...

Hindustan Petroleum organizes competent cycle rally | हिंदुस्तान पेट्रोलियमतर्फे सक्षम सायकल रॅलीचे आयोजन

हिंदुस्तान पेट्रोलियमतर्फे सक्षम सायकल रॅलीचे आयोजन

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सक्षम सायकल रॅलीमध्ये महापौर गीता सुतार, किरण जीवन, किरण वाघमारे, राहुल पाटील आदी सहभागी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतर्फे इंधन आणि पर्यावरण सक्षम सायकल रॅली काढण्यात आली. गणपतराव आरवाडे हायस्कूलमध्ये महापौर गीता सुतार यांच्याहस्ते ध्वज दाखवून रॅलीची सुरुवात झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित विद्यार्थ्यांना सहभागासाठी परवानगी देण्यात आली होती. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या हजारवाडी एलपीजी प्रकल्पाचे व्यवस्थापक किरण जीवन, गॅसवाहिनी प्रकल्पाचे व्यवस्थापक किरण वाघमारे, शाहुवाडीचे पंचायतीचे अधिकारी झाकीर हुसेन मुजावर, आरवाडे हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत कोष्टी, सुनील कुंभार, मुन्नाभाई पटेकरी आदी उपस्थित होते.

इंधनाच्या बचतीसाठी सर्वांनी सायकलींचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन किरण जीवन यांनी केले. नैसर्गिक स्त्रोत मर्यादित असल्याने नागरिकांनी इंधनाची बचत करण्याचे आवाहन वाघमारे यांनी केले.

रॅलीचे संयोजन वितरण अधिकारी राहुल पाटील व सहकाऱ्यांनी केेले.

-------

Web Title: Hindustan Petroleum organizes competent cycle rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.