आष्ट्यात हळदीला उच्चांकी १३ हजार ९०१ हजार दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:31+5:302021-02-15T04:23:31+5:30

आष्टा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा येथील उपबाजारात रविवारी शेतकरी व संचालक खरेदीदारांच्या उपस्थितीत हळदीचे सौदे ...

The highest rate of 13 thousand 901 thousand for turmeric in Ashta | आष्ट्यात हळदीला उच्चांकी १३ हजार ९०१ हजार दर

आष्ट्यात हळदीला उच्चांकी १३ हजार ९०१ हजार दर

आष्टा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आष्टा येथील उपबाजारात रविवारी शेतकरी व संचालक खरेदीदारांच्या उपस्थितीत हळदीचे सौदे सुरू करण्यात आले. यावेळी हळदीला उच्चांकी १३ हजार ९०१ रुपये दर मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अल्लाउद्दीन चौगुले, उपसभापती सुरेश गावडे, माजी सभापती ॲड. विश्वासराव पाटील, दत्तात्रय मस्के, दिलीप कदम, बाळासाहेब इंगळे, कलगोंडा पाटील, बाबासाहेब पाटील, बाजीराव पाटील, नागेश देसाई, सचिव विजय जाधव, व्यापारी गोपाळदास मर्दा, राजू मानकर, बाबूराव पाटील, अनिल भाई, अनिल नेमाणी, सतीश कुमार, सुरेश कुमार, धनपाल आवटी उपस्थित होते.

अल्लाउद्दीन चौगुले म्हणाले, माजी आमदार विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा उपबाजारात हळदीचे सौदे सुरू झाले आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना जवळची हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या बाजारात हळद पाठवून सहकार्य करावे. शेतकरी, अडत दुकानदार व व्यापारी यांना बाजार समितीच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रारंभी गोपालदास मर्दा व सभापती अल्लाउद्दीन चौगुले व मान्यवरांच्या उपस्थितीत हळद सौदे सुरू करण्यात आले.

चौकट

हळदीला झळाळी

आष्टा येथील हळद बाजारात ११८० पोती हळदीची आवक झाली. क्रमांक १ च्या हळदीला ११ हजार ते १३ हजार ९०१, क्रमांक २ च्या हळदीला ८ हजार ५०० ते १० हजार ५००, कनीला ७५०० ते ८ हजार, गट्टा ८ हजार ५०० ते ९ हजार २००; तर चोरा १९ हजार ते २२ हजार रुपये दर मिळाला. हळदीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

फोटो-१४आष्टा१

फोटो: आष्टा येथील हळद सौदे सुरू झाले. यावेळी गोपाळदास मर्दा, अल्लाउद्दीन चौगुले, सुरेश गावडे, ॲड. विश्वासराव पाटील, बाळासाहेब इंगळे, दत्तात्रय मस्के, विजय जाधव, नागेश देसाई, बाजीराव पाटील उपस्थित होते.

Web Title: The highest rate of 13 thousand 901 thousand for turmeric in Ashta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.