मिरजेतील मंडळांचा उंच गणेशमूर्तींवर भर

By Admin | Updated: September 7, 2016 23:54 IST2016-09-07T23:39:49+5:302016-09-07T23:54:12+5:30

देखावे पाहण्यासाठी गर्दी : कारंजे, विविध मंदिरांच्या प्रतिकृती, आकर्षक विद्युत रोषणाईला पसंती

High Mandation of Mandal Mandals | मिरजेतील मंडळांचा उंच गणेशमूर्तींवर भर

मिरजेतील मंडळांचा उंच गणेशमूर्तींवर भर

मिरज : मिरजेतील गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, भव्य गणेशमूर्तींची स्थापना, कमानी, कारंजे, विविध प्रतिकृती असे देखावे साकारले आहेत. यावर्षी अनेक मंडळांनी समाजप्रबोधनात्मक जिवंत देखाव्यांऐवजी उंच गणेशमूर्तींची स्थापना केली आहे.
मिरजेला सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांची परंपरा आहे. मात्र यावर्षी देखाव्यांऐवजी अनेक मंडळांच्या मोठ्या आकारातील गणेशमूर्ती आहेत. उंच मूर्ती, विविध मंदिरांच्या प्रतिकृती, सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
बुधवार पेठेतील कनवाडकर हौद येथील शिवगर्जना गणेशोत्सव मंडळाची शंकराच्या हातावर विराजमान असलेली २१ फूट उंच मूर्ती आहे. पाटील गल्लीतील न्यू ओंकार गणेशोत्सव मंडळाची हत्तीच्या सोंडेवरील गणेशाची उंच मूर्ती आहे. ब्राह्मणपुरीतील विश्व चौक गणेशोत्सव मंडळाचा ‘छोटा भीम’ हा देखावा पाहण्यासाठी बालगोपाळांची गर्दी होत आहे. वैरण बाजारातील सह्याद्री गणेश मंडळाने मुषकावरील गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
कुंभार खण येथील कृष्णेश्वर गणेश मंडळाची घंटीवरील गणेशाची १६ फूट उंच मूर्ती आहे. ब्राह्मणपुरीतील विठ्ठल गणेश मंडळाची २१ फूट उंचीची आकर्षक मूर्ती आहे. मंगळवार पेठेतील गजराज मंडळाची चांदीची गणेशमूर्ती व शिवाजी चौक मंडळाची आकर्षक मूर्ती आहे. शिवगर्जना मंडळाने १९ फूट उंच सिंहासनारूढ गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. कर्मवीर चौकातील महागणपती मंडळाने २० फूट उंच गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. लोणारी समाज गणेशोत्सव मंडळाची बासरीवरील मूर्ती आहे. सांगली वेस कैकाडी गल्ली गणेश मंडळाची बासरीवरील गणेशमूर्ती आहे. (वार्ताहर)


प्रबोधनपर देखावे : मंडळांचे प्राधान्य
बुधवार पेठ गणेश मंडळ, नदीवेस येथील शेतकरी गणेश मंडळ, तासीलदार गल्ली येथील बसवेश्वर गणेश मंडळ, भोसले गल्लीतील गजमुख गणेश मंडळ या मंडळांनी सामाजिक संदेश देणारे प्रबोधनपर साकारलेले सजीव देखावे केले आहेत. ब्राह्मणपुरीतील शिवनेरी गणेश मंडळाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.

Web Title: High Mandation of Mandal Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.