पेपर अवघड गेल्याने तिची आत्महत्या
By Admin | Updated: March 2, 2017 17:15 IST2017-03-02T17:12:01+5:302017-03-02T17:15:08+5:30
बारावी परीक्षेत इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. आरती कुमार कुमसगे (१७, रा. कुपवाड रोड) असे या विद्यार्थीचे नाव आहे.

पेपर अवघड गेल्याने तिची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 02 - बारावी परीक्षेत इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. आरती कुमार कुमसगे (१७, रा. कुपवाड रोड) असे या विद्यार्थीचे नाव आहे.
आरतीला बुधवारी (दि.01) इंग्रजीचा पेपर अवघड गेला होता. त्यामुळे ती तणावाखाली होती. तसेच, रात्री तिने जेवणही केले नाही. तिच्या आईने रात्री जेवणाचा आग्रह केला पण तिने नकार दिला होता.
दरम्यान, आरतीने घरातील जिन्याजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. हा सर्व प्रकार सकाळी सहा वाजताच्या सुमारास कुटुंबियांच्या निदर्शनास आला.