मिरजेत गुरुवारी रक्तविकार तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:20+5:302021-02-08T04:23:20+5:30
थैलेसिमीया, हिमोफिलीया, (ॲनिमिया) हे रक्ताचे वेगवेगळे आजार वाढत आहेत. थैलेसिमीयाग्रस्त मुले जन्माला येत असल्याने या मुलांच्या उपचार खर्चाने कुटुंबे ...

मिरजेत गुरुवारी रक्तविकार तपासणी शिबिर
थैलेसिमीया, हिमोफिलीया, (ॲनिमिया) हे रक्ताचे वेगवेगळे आजार वाढत आहेत. थैलेसिमीयाग्रस्त मुले जन्माला येत असल्याने या मुलांच्या उपचार खर्चाने कुटुंबे मेटाकुटीला येत आहेत. हा आजार टाळण्यासाठी लग्नाआधी कोणत्या तपासण्या कराव्यात. थैलेसिमीयाग्रस्त मुलांना जगण्यासाठी कशाची गरज लागते याबाबत तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. तपासण्या न केल्याने हा आजार गंभीर होऊ शकतो. त्यामुळे या मुलांच्या रक्ताच्या तपासण्या, ईसीजी. सोनोग्राफी, ईको, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एचएलए मॅचिंग आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच संवेदना मेडिकल फाउंडेशन, मिरज सिव्हिल, ॲस्टर हॉस्पिटल बंगळुरू, साद वेलफेअर फाउंडेशन यांच्यातर्फे एचएलए मॅचिंग उपक्रम राबवण्यात येत असून, थैलेसिमीया, लुकेमिया तपासणीचा हिमोफिलिया, कॅन्सर, सिकलसेल या रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच रक्तदान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांनी केले आहे. गुरुवारी, दि.११ रोजी सकाळी मिरज सिव्हिलमध्ये ॲनाटॉमी विभागात शिबिर आयोजित करण्यात आले आहे.