संतोष भिसे सांगली : कोरोना लसीसंदर्भात शंकासमाधानासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाईन सुरु केली आहे. लसीच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाईनवर मिळणार आहेत.लसीच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरीकांत लसीकरणाविषयी गोंधळाचे वातावरण आहे. त्यांच्या शंकासमाधानासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला. लस कधी येणार?, पहिला डोस कधी मिळणार?, दुसरा डोस किती दिवसांनी मिळणार?, आजारी अवस्थेत किंवा गर्भवतींनी लस घ्यायची का?, जिल्ह्यात कोठेकोठे लसीकरण सुरु आहे?, लसीसाठी नोंदणी करायची की थेट मिळणार? या प्रश्नांची उत्तरे हेल्पलाईनवर मिळतील.पहिली कोव्हॅक्सिन घेतली, दुसरी कोविशिल्ड चालेल का?, दोन डोसमध्ये किती दिवसांचे अंतर ठेवायचे?, लसीकरणानंतर आजारी पडल्यास काय काळजी घ्यायची?, आज कोठे लसीकरण सुरु आहे? अशा सर्व प्रश्नांची माहिती मिळेल. जिल्हा परिषदेत सकाळी ८ रात्री ८ या वेळेत हेल्पलाईन नागरीकांचे शंकासमाधान करेल. लसींची उपलब्धता, पात्र लाभार्थी माहिती, शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या नविन मार्गदर्शक सूचना यावरुन मिळतील.येथे साधा संपर्कलसीकरणासाठीचे हेल्पलाईन क्रमांक ०२३३-२३७३०३२, २३७४४६२ असे आहेत. याशिवाय covidvac.zpsangli@gmail.com या मेलवरही संपर्क साधता येईल. ग्रामिण भागासह महापालिका क्षेत्राचीही माहिती दिली जाईल असे डुडी यांनी सांगितले.
Corona vaccine : सांगली जिल्हा परिषदेची लसीकरण माहितीसाठी हेल्पलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 10:48 IST
Corona vaccine Sangli Zp : कोरोना लसीसंदर्भात शंकासमाधानासाठी सांगली जिल्हा परिषदेने हेल्पलाईन सुरु केली आहे. लसीच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाईनवर मिळणार आहेत.
Corona vaccine : सांगली जिल्हा परिषदेची लसीकरण माहितीसाठी हेल्पलाईन
ठळक मुद्देसांगली जिल्हा परिषदेची लसीकरण माहितीसाठी हेल्पलाईनप्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाईनवर मिळणार