लोणारी समाजाच्या वतीने ऊसतोड मजुरांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:33+5:302021-02-05T07:20:33+5:30

आष्टा : येथील ऊसतोड मजुरांच्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्याने सांगली जिल्हा लोणारी समाजाच्या वतीने या ऊसतोड मजुरांना ...

Helping sugarcane workers on behalf of Lonari community | लोणारी समाजाच्या वतीने ऊसतोड मजुरांना मदत

लोणारी समाजाच्या वतीने ऊसतोड मजुरांना मदत

आष्टा : येथील ऊसतोड मजुरांच्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्याने सांगली जिल्हा लोणारी समाजाच्या वतीने या ऊसतोड मजुरांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले.

आष्टा येथील ऊसतोड मजुरांच्या झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली जिल्हा लोणारी समाज सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती घेऊन बाधित कुटुंबांना मदत देण्यात आली. यामध्ये २५ किलो गहू, २५ किलो ज्वारी, १० किलो तांदूळ, चटणी, तेल, डाळी, भांडी, ब्लँकेट, चटई असे साहित्य देण्यात आले. याकामी सांगली जिल्हा लोणारी समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तराज हिप्परकर, प्रल्हाद नरळे, शिवाजी क्षीरसागर, सुभाष नरळे, आनंदा करंडे, हनुमंत कुटे, गोपाळ खोत, बाबू गोडसे, संजय खोत यांनी मोलाचे योगदान दिले.

फोटो: ३१०१२०२१-आयएसएलएम-आष्टा लोणारी न्यूज

आष्टा येथील ऊसतोड मजुरांना लोणारी समाजाच्या वतीने मदत देताना दत्तराज हिप्परकर, प्रल्हाद नरळे, शिवाजी शिरसागर, गोपाळ खोत, आनंदा करंडे, हनुमंत कुटे, बाबू गोडसे उपस्थित होते.

Web Title: Helping sugarcane workers on behalf of Lonari community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.