आटपाडीत प्राध्यापकाच्या कुटुंबास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:19+5:302021-05-08T04:26:19+5:30

आटपाडी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील प्रा. दीपक राजमाने यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षण संस्थेच्या ...

Helping the professor's family in Atpadi | आटपाडीत प्राध्यापकाच्या कुटुंबास मदत

आटपाडीत प्राध्यापकाच्या कुटुंबास मदत

आटपाडी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील प्रा. दीपक राजमाने यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षण संस्थेच्या पतमंडळातर्फे १० लाखांची मदत संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते देण्यात आली.

द आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या सेवक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत पतमंडळाच्या सभासदाचे आकस्मिक निधन झाल्यास पतमंडळातर्फे त्यांच्या वारसांना १० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सभासद असणारे श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील रसायनशास्र विषयाचे प्राध्यापक डॉ. दीपक सुखदेव राजमाने यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या वारसांना मदतीचा धनादेश देण्यात आला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंब्याचे रोप दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे कुटुंबप्रमुख अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पतमंडळाचे अध्यक्ष डी. एन. कदम, सचिव दशरथ बनसोडे उपस्थित होते.

Web Title: Helping the professor's family in Atpadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.