ऋतुराज घाडगे यांच्याकडून वाढदिवसाचा खर्च टाळून रुग्णांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:18 IST2021-07-08T04:18:10+5:302021-07-08T04:18:10+5:30
ओळ : शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. प्राची घाटगे व ऋतुराज घाटगे, डॉ. अनिरुद्ध काकडे यांच्या हस्ते माेफत इंजेक्शनचे ...

ऋतुराज घाडगे यांच्याकडून वाढदिवसाचा खर्च टाळून रुग्णांना मदत
ओळ : शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. प्राची घाटगे व ऋतुराज घाटगे, डॉ. अनिरुद्ध काकडे यांच्या हस्ते माेफत इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोरोना रुग्णांना झालेला न्युमोनिया कमी करण्यासाठी मॅक्झोन प्लस हे इंजेक्शन उपयोगी ठरते. यामुळे डॉ. ऋतुराज घाटगे यांनी लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून उपजिल्हा रुग्णालयाला या इंजेक्शनच्या १७५ व्हाईल्स भेट दिल्या. येथील उपजिल्हा रुग्णालयात आयाेजित या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुध्द काकडे, डॉ. प्राची घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ऋतुराज घाटगे म्हणाले, शिराळा तालुका ग्रामीण आणि डोंगराळ आहे. बहुतांशी अशिक्षित नागरिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक नाहीत. त्यामुळे अंतिम टप्प्यात आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून जवळपास २५ हजार रुपये किमतीची ही इंजेक्शन घाटगे परिवाराकडून उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना मोफत देऊ केली आहेत. यावेळी विश्वराज निकम, डॉ. अजय पाटील, विश्वास यादव, योगेश गवळी, आदी मान्यवर उपस्थित होते.