‘सोनहिरा’तर्फे मृत कामकाराच्या वारसास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:30 IST2021-01-16T04:30:42+5:302021-01-16T04:30:42+5:30

वांगी : येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यातर्फे मृत कामगाराच्या वारसास दोन लाखांचा धनादेश मदत म्हणून ...

Helping the heirs of the deceased worker by ‘Sonhira’ | ‘सोनहिरा’तर्फे मृत कामकाराच्या वारसास मदत

‘सोनहिरा’तर्फे मृत कामकाराच्या वारसास मदत

वांगी : येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यातर्फे मृत कामगाराच्या वारसास दोन लाखांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते शेती विभागातील मृत कर्मचारी महादेव रामचंद्र घार्गे (रा. उपाळे मायणी) यांचे वारस अरुंधती महादेव घार्गे आणि सौरभ महादेव घार्गे यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला.

मोहनराव कदम म्हणाले, महादेव घार्गे हे आपले शेती विभागामध्ये शेती मदतनीस म्हणून १९ वर्षे कार्यरत होते. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले, त्यांचे कुटुंब निराधार झाले. माणुसकीच्या नात्याने त्यांच्या कुटुंबाला ही मदत दिली जात आहे.

यावेळी संचालक दिलीपराव सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी सयाजी जाधव, शेती अधिकारी प्रशांत कणसे, उपशेती अधिकारी वैभव जाधव तसेच गोरख कांबळे व सभासद उपस्थित होते.

फोटो-१५वांगी१

Web Title: Helping the heirs of the deceased worker by ‘Sonhira’