ढालगावला स्वराज्य कलेक्शनची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:25 IST2021-05-15T04:25:51+5:302021-05-15T04:25:51+5:30

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्यानेच कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या ...

Help of Swarajya Collection to Dhalgaon | ढालगावला स्वराज्य कलेक्शनची मदत

ढालगावला स्वराज्य कलेक्शनची मदत

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्यानेच कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी स्वराज कलेक्शनचे मालक अजितराव खराडे यांनी जेवणाची सोय केली आहे. येथे सध्या महाराष्ट्र, कर्नाटक कवठेमहांकाळ, जत, सांगोला परिसरातील रुग्ण दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र, त्यांच्या नातेवाइकांना जाण्या-येण्यासाठी त्रास नको म्हणून माणुसकीच्या नात्याने स्वराज कलेक्शनचे मालक अजितराव खराडे यांनी जेवणाची सोय केली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रावसाहेब रूपनर, डॉ. अभिजित सांगलीकर, उज्ज्वला शेजूळ, अमोल साठे, समाधान खरात, कुंडलिक काळे, विद्या बुवा, रूपाली गोंजारे, लता सुतार यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या मदतीबद्दल डॉ. सतीश कोळेकर, डॉ. रावसाहेब रूपनर यांनी स्वराज कलेक्शनच्या अजितराव खराडे यांचे आभार मानले.

Web Title: Help of Swarajya Collection to Dhalgaon