टाकळीतील तरुणांकडून अनाथाश्रमास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:24+5:302021-06-16T04:35:24+5:30

फोटो ओळ - टाकळी (ता.मिरज) येथील किरण सौदी व त्यांच्या मित्रांनी माहेर अनाथाश्रमास जीवनावश्यक किटचे वाटप केले. टाकळी ...

Help to the orphanage from the youth of Takli | टाकळीतील तरुणांकडून अनाथाश्रमास मदत

टाकळीतील तरुणांकडून अनाथाश्रमास मदत

फोटो ओळ - टाकळी (ता.मिरज) येथील किरण सौदी व त्यांच्या मित्रांनी माहेर अनाथाश्रमास जीवनावश्यक किटचे वाटप केले.

टाकळी : टाकळी (ता.मिरज) येथील किरण सौदी या तरुणाने माणुसकी जपत रस्त्यात बेवारस सापडलेल्या पैशातून अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या मिरजेतील माहेर या संस्थेस जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

किरण सौदी व त्याचा मित्र प्रवीण देसाई हे दोघे कामानिमित्त मिरजेत आले होते. ते दत्त चौकात आले असता, त्यांना अडीच हजार रुपये रस्त्यावर पडलेले सापडले. त्यांनी सुमारे दोन तास ज्यांचे पैसे पडले असतील, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पैशांबाबत कोणीच दावा केला नसल्याने, त्यांनी ही बाब त्यांच्या मित्रांना सांगितले. हरवलेल्या पैशासाठी कोण येईल का, यासाठी दोन दिवस त्यांनी वाट पाहिले. त्यानंतर, त्यांनी या पैशाची मदत ‘माहेर’ अनाथाश्रमास करण्याचे ठरविले.

या अडीच हजारांमध्ये स्वतःकडील काही पैसे घालून जीवनावश्यक वस्तू माहेर संस्थेस दिल्या. किरण सौदी, उमेश पाटील, स्वराज्य पाटील, अक्षय कोल्हापुरे, नीलेश पाटील, आप्पासाहेब हिप्परगे यांनी यासाठी पुढाकार घेतला. या मदतीबाबत माहेर संस्थेने तरुणांचे आभार मानले.

Web Title: Help to the orphanage from the youth of Takli