महाडिक मल्टिस्टेटकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST2021-04-13T04:25:09+5:302021-04-13T04:25:09+5:30

महाडिक मल्टिस्टेट इस्लामपूरच्या वतीने मदतीचा धनादेश पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना अध्यक्ष सतीश महाडिक व कार्यकारी संचालक आर. एम. ...

Help for CCTV cameras from Mahadik Multistate | महाडिक मल्टिस्टेटकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मदत

महाडिक मल्टिस्टेटकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी मदत

महाडिक मल्टिस्टेट इस्लामपूरच्या वतीने मदतीचा धनादेश पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना अध्यक्ष सतीश महाडिक व कार्यकारी संचालक आर. एम. बागडी यांनी सुपूर्द केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या वतीने पोलीस दलाने राबविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमासाठी मदतीचा धनादेश देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सतीश महाडिक आणि कार्यकारी संचालक आर. एम. बागडी यांनी मदतीचा धनादेश पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.

पोलीस विभागाने खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे. शहर पोलिसाच्या या उपक्रमाचे सर्व क्षेत्रांतून कौतुक होत असल्याचे मत संस्थेचे संस्थापक राहुल महाडिक यांनी व्यक्त केले.

सतीश महाडिक म्हणाले, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. राहुल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात.

Web Title: Help for CCTV cameras from Mahadik Multistate