पुत्र गमावलेल्या दाम्पत्याची भिलवडी कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:55+5:302021-06-10T04:18:55+5:30
भिलवडी : चार महिन्यांपूर्वी पुत्राचे अकाली निधन झाले. त्याच्या वियोगाने दुःखी झालेल्या आई-वडिलांनी त्याच्याकडील सामाजिक उत्तरदायित्वाचा वसा हाती घेतला. ...

पुत्र गमावलेल्या दाम्पत्याची भिलवडी कोविड सेंटरला मदत
भिलवडी : चार महिन्यांपूर्वी पुत्राचे अकाली निधन झाले. त्याच्या वियोगाने दुःखी झालेल्या आई-वडिलांनी त्याच्याकडील सामाजिक उत्तरदायित्वाचा वसा हाती घेतला. भिलवडी ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या कोविड सेंटरला पाच हजार रुपयांची देणगी दिली.
संजय कवठेकर व भारती कवठेकर हे भिलवडी (ता. पलूस) गावातील दाम्पत्य. संजय कवठेकर चितळे डेअरीमध्ये नोकरी करतात. त्यांना दोन मुले. गरिबीमुळे थोरला मुलगा आजोळी शिक्षणासाठी राहिला. धाकटा मुलगा सौरभ बावीस वर्षांचा. बारावीपर्यंत शिक्षण. कृष्णाकाठ सोशल फाउंडेशनमधील सक्रिय कार्यकर्ता. चार महिन्यांपूर्वी हृदयविकाराने त्याचे निधन झाले. त्यावेळी घरात तो एकटाच होता. उपचारासाठी नेण्याची संधीही मिळाली नाही. पुत्रवियोगाच्या धक्क्यातून जन्मदाते अद्यापही सावरू शकले नाहीत. लेकरावर जी वेळ आली, ती इतरांवर येऊ नये म्हणून दोघांनीही कोविड सेंटरला मदतीसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कृष्णाकाठ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल वंडे उपस्थित होते.
फोटो -
भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्याकडे मदतीचा धनादेश देताना भारती व संजय कवठेकर, अमोल वंडे, आदी.