मिरजेत खराब रस्त्यात अवजड वाहने अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:32+5:302021-08-29T04:26:32+5:30
मिरज : मिरजेत पावसाने रस्त्यांची दैना उडाली असून आंबेडकर उद्यान ते परमशेट्टी रुग्णालय रस्त्यात ट्रक अडकल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण ...

मिरजेत खराब रस्त्यात अवजड वाहने अडकली
मिरज : मिरजेत पावसाने रस्त्यांची दैना उडाली असून आंबेडकर उद्यान ते परमशेट्टी रुग्णालय रस्त्यात ट्रक अडकल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
मिरजेत पावसाने रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या परिसरात रस्त्यांतील खड्ड्यात वारंवार वाहने अडकत आहेत. रस्त्याची अपूर्ण कामे, खोदलेल्या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य, खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात, रस्त्यात अडकणारी वाहने, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात, यामुळे नागरिक संतप्त आहेत. महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करुनही रस्त्याची कामे अपूर्णच आहेत. शहरात रस्ते, ड्रेनेजची परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांनी विचारणा केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांकडून रस्ते व ड्रेनेज समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात येते; मात्र या समस्या कायम असल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. रस्त्यात अडकलेले वाहन काढल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.