मांगले-सावर्डे बंधाऱ्यावरून जड वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:18+5:302021-04-23T04:29:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : मांगले-सावर्डे बंधाऱ्यावरून जड वाहनांची वाहतूक बंद होणार आहे. त्यादृष्टीने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजड्नाला ...

Heavy traffic off Mangle-Savarde embankment | मांगले-सावर्डे बंधाऱ्यावरून जड वाहतूक बंद

मांगले-सावर्डे बंधाऱ्यावरून जड वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मांगले : मांगले-सावर्डे बंधाऱ्यावरून जड वाहनांची वाहतूक बंद होणार आहे. त्यादृष्टीने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजड्नाला बॅरिकेड्स लावली आहेत. केवळ दुचाकी आणि नऊ फुटांपर्यंत उंची असणारी वाहनेच बंधाऱ्यावरून जाऊ शकणार आहेत. या मार्गावरील मोठी वाहने कांदे-सावर्डे मार्गावरून न्यावी लागणार आहेत.

मांगले-काखे पुलाचे काम सुरू असल्यामुळे वर्षभरापासून सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्यांना चिकुर्डे-अमृतनगर किंवा काही प्रवाशांना मांगले-सावर्डे बंधाऱ्यावरून जावे लागत होते. आता लहान वाहने सोडून अवजड वाहनांना पर्यायी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

१९८४ साली बांधलेला हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण दगडी आहे. त्यामुळे मोठी गळती लागली आहे. अनेक वर्षांपासून बंधाऱ्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती. शिराळ्याचे आ. मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नामुळे

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गेल्या जून महिन्यात भेट देऊन दुरुस्तीचे आदेश दिले होते. दुरुस्तीचे काम अद्याप सुरू नाही. बंधाऱ्याचा संभाव्य धोका ओळखून पाटबंधारे विभागाने जड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोडोली पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एम. एम. किटवाडकर म्हणाले की, जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी होती. बंधाऱ्याला होणारा धोका ओळखून बॅरिकेड्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बाजूंना चॅनेल लावले आहेत. मात्र, नऊ फुटांवरचा चॅनेल अद्याप लावलेला नाही.

Web Title: Heavy traffic off Mangle-Savarde embankment