मिरज-सलगरे मार्गावर अवजड वाहतूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:16+5:302021-07-04T04:19:16+5:30
सांगली : बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिरज-सलगरे मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी या मार्गावरून अवजड वाहनांचे ...

मिरज-सलगरे मार्गावर अवजड वाहतूक वाढली
सांगली : बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिरज-सलगरे मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी या मार्गावरून अवजड वाहनांचे प्रमाणही खूप वाढले आहे. बेळंकी परिसरात असलेल्या खाणीतून मुरूम, खडी घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी नवीन रस्ता खचला आहे.
------
लक्ष्मी मंदिराजवळ उंचवटा ठरतोय अडचणीचा
सांगली : शहरातील कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर चौकात पाईपलाईनसाठी करण्यात आलेला उंचवटा वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. हा उंचवटा पार करूनच वाहनधारकांना चिन्मय पार्ककडे जावे लागत असल्याने वाहने खाली घासून वाहनधारकांचे नुकसान होत आहे.
-----
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी
सांगली : महावितरण व महापारेषणमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी बनले आहे. कमी पगारात काम करूनही त्यांना कायम करण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही. उलट अचानकपणे सांगून कामावरून कमी केले जात असल्याने अशा कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.
------
मोकाट घोड्यांमुळे वाहनधारकांना त्रास
सांगली : शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांत मोकाटपणे फिरत असलेल्या घोड्यांमुळे अडचणी वाढल्या आहेत. रस्त्यावर असलेले घोडे अचानकपणे दिसून येत नसल्याने वाहनधारकांचा अपघात होत आहे. त्यामुळे अशा बेवारसपणे फिरत असलेल्या घोड्यांना बंदिस्त करण्याची मागणी होत आहे.
-----
मिरज-माधवनगर मार्गावरील गतिरोधकांमुळे शिस्त
सांगली : मिरज-माधवनगर रस्त्याचा दर्जा चांगला असल्याने भरधावपणे जाणाऱ्या वाहनांना अंकुश बसला आहे. या मार्गावर वारंवार हाेत असलेल्या अपघातांमुळे गतिरोधकांची मागणी होत होती. बांधकाम विभागाने अहिल्यानगर, यशवंतनगर, सूतगिरणी चौकासह सर्व मार्गांवर गतिरोधक उभारल्याने या मार्गावरील वाहतुकीला शिस्त लागली आहे.