शिराळा पश्चिम भागात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:28+5:302021-04-30T04:34:28+5:30

कोकरुड : बुधवारी पाच वाजल्याच्या सुमारास शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात आठवड्यात तिसऱ्या वेळी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. खरीप ...

Heavy rains in the western part of Shirala | शिराळा पश्चिम भागात मुसळधार पाऊस

शिराळा पश्चिम भागात मुसळधार पाऊस

कोकरुड : बुधवारी पाच वाजल्याच्या सुमारास शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात आठवड्यात तिसऱ्या वेळी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. खरीप हंगामाच्या मशागतीला यामुळे वेग आला आहे.

या आठवड्यात तब्बल तीनवेळा उन्हाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास येळापूर, मेणी, गुढे, पाचगणी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. तब्बल अर्धा तास या पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या मशागतीला यामुळे वेग आला आहे.

Web Title: Heavy rains in the western part of Shirala