शिराळा तालुक्यात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:05+5:302021-05-08T04:28:05+5:30

शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने दीड तास हजेरी लावली. ...

Heavy rains in Shirala taluka | शिराळा तालुक्यात वादळी पाऊस

शिराळा तालुक्यात वादळी पाऊस

शिराळा : शिराळा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने दीड तास हजेरी लावली.

यामुळे ऊस, भाजीपाला, फळझाडे, घरे व जनावरांचे शेड आदींचे नुकसान झाले. काही ठिकाणी पावसामुळे ऊसपिकास जीवदान मिळाले आहे.

शिराळा शहरासह चिखली, सागाव, बिऊर, मांगले, कापरी, कोकरूड, आरळा व तालुक्याच्या उत्तर भागात वादळी वारा, गारा व पाऊस यामुळे शेतातील पिके, आंबा, घरे व पत्र्यांच्या शेडचे व गवत गंज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ढगांचा गडगडाट होऊन जोराचे वारे सुटले. टोमॅटो पिके जमीनदोस्त झाली आहेत.

काही ठिकाणी आडसाली ऊस पडले आहेत, तर झाडेदेखील उन्मळून पडली आहेत.

Web Title: Heavy rains in Shirala taluka