वाळवा परिसरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:38+5:302021-06-18T04:18:38+5:30
वाळवा : वाळवा आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. ओढे, ओघळी तुडुंब वाहत आहेत. एक फुटापर्यंत जमिनीत ओल झाल्याने ...

वाळवा परिसरात मुसळधार पाऊस
वाळवा : वाळवा आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. ओढे, ओघळी तुडुंब वाहत आहेत. एक फुटापर्यंत जमिनीत ओल झाल्याने खरिपाच्या पेरणीला गती आली आहे.
यावर्षी मान्सून वेळेत सुरू झाला आहे. रोहिणी नक्षत्राचा पाऊससुद्धा वळीव स्वरूपात पडला आहे. मृग नक्षत्राचा पाऊस ०८ जूनपासून अधूनमधून सुरू आहे.
बुधवारी दिवसभर अधूनमधून पाऊस कोसळत आहे. गेली पंधरा तास एकसारखा पाऊस सुरू आहे. जमिनीत एक फुटापेक्षा जास्त ओल झाल्याने बळीराजा सुखावला आहे. खरिपाच्या पेरणींना लगेच गती आली आहे. सोयाबीन, भुईमूग, कडधान्यांच्या पेरणीला शेतकऱ्यांनी लगेचच सुरुवात केली आहे. बावची रस्ता, कामेरी रस्ता, डबाण, चिमट्यात, पांढरभाग, अहिरवाडी व साखराळे रस्ता, हुतात्मा दूध संघ परिसरातील पिकावू शेतजमीन, इस्लामपूर रस्ता या ठिकाणी शेतकऱ्यांनी सऱ्या सोडलेल्या शेतात पेरणीला सुरुवात केली आहे.