दिघंची परिसरात पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST2021-04-12T04:24:23+5:302021-04-12T04:24:23+5:30
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह दमदार पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण ...

दिघंची परिसरात पावसाची दमदार हजेरी
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह दमदार पावसाने हजेरी लावली.
उकाड्याने हैराण झालेल्या दिघंचीकरांना यामुळे गारवा मिळाला. सध्या दिघंची परिसरात रबीची सुगी अंतिम टप्प्यात आहे. मोजक्याच शेतकऱ्यांची पिके असल्याने पिकांचे नुकसान होणार आहे. तर पाण्याविना करपू लागलेल्या उन्हाळी पिकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उकाडा जाणवत होता. रविवार सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दिवसभर उकाड्याने व विजेचा लपंडाव सुरूच असल्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी चार वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला तर उन्हाळी पाऊस झाल्याने पिकाला फायदेशीर ठरणार आहे. दिघंची परिसरातील अनेक जणांनी या पावसात भिजून पावसाचा आनंद लुटला.