शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा तडाखा, 5 जण जखमी, घरांचे नुकसान अन् कंपन्यांवरील पत्रेही उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:41 IST

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे.

सांगली/शिराळा - येथील औद्योगिक वसाहत आणि भटवाडी गावामध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या पाऊस व वाऱ्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. औद्योगिक वसाहतीतील तीन मुली, एक महिला तर भटवाडी येथील एक महिला असे पाच जण जखमी झाले असून मेघा लक्ष्मण पाटील (वय २३ रा.थावडे,  ता शाहूवाडी जि कोल्हापूर ) या गंभीर जखमी आहेत. रस्त्यावर, सगळीकडे पाणीच पाणी तसेच दूरवर पत्रे उडतानाचे भयावह दृश्य दिसत होते. भटवाडी येथील शेतातील बांध फुटून शेतांचेही ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. इकोराईज बायो फर्टिलयझर कंपनीची भिंत पडली व पत्रे उडून गेले. त्यामध्ये मेघा पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा), सविता बाजीराव निकम (वय ४०), स्नेहल आनंदराव मस्के (वय २३) यांनाही डोक्यास मार लागून तर नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा) यांचे दोन्ही हात फॅक्चर होऊन जखमी झाल्या आहेत. तसेच, घनश्याम आवटे यांच्या ऐज टीव्ही कंपनीचे इमारतीचे पत्रे उडून गेले आणि भिंतही कोसळली. 

मुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे. दिलीप पाटील तसेच आणखी एकाच्या राईस मिलचे पत्रे उडून गेले आहेत. त्याचबरोबर आणखी ३-४ कंपन्या ज्यांचे इमारतीचे काम सुरू आहे, अश्या नवीन कंपनीचे शेड उडून गेले आहेत. एक दोन किलोमीटर पत्रे उडून शेतात जाऊन पडले तर काही विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर अडकले होते. पावसामुळे ही दाणादाण उडाली, सर्वत्र रस्त्यावर, कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.  या औद्योगिक वसाहतीच्या शेजारीच असणाऱ्या भटवाडी गावातील नरसिंह टेक वस्तीमधील १० ते १५ घरांच्या भिंती पडल्या आहेत तर काही घरांचे छत उडून गेले आहेत. तसेच घराचा छत डोक्यावर पडल्याने अर्चना प्रकाश चव्हाण या जखमी झाल्या आहेत. येथील शेतांमध्ये बांध फुटून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

घरांचेही नुकसान

भटवाडी येथील प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण, सुभाष बाळू चव्हाण, हंबीर बाळू चव्हाण, शीला शंकर चव्हाण, युवराज शामराव चव्हाण, राजाराम लक्ष्मण चव्हाण, अकाराम लक्ष्‍मण चव्‍हाण, बाबासो शंकर फडतरे यांच्या घरांचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत, त्यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.  

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसcycloneचक्रीवादळ