सांगली, मिरजेत जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:06+5:302021-09-06T04:30:06+5:30
सांगली : शहर व परिसरात रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून राहिले, तर ...

सांगली, मिरजेत जोरदार पाऊस
सांगली : शहर व परिसरात रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून राहिले, तर गुंठेवारीत दलदल निर्माण झाली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम व जोर कायम असणार आहे.
सांगली, मिरजेत रविवारी सकाळी सूर्यदर्शन झाले. साडे अकरा वाजता ढगांची दाटी झाली. दुपारी १ नंतर पावसास सुरुवात झाली. मध्यम स्वरुपाच्या पावसाने शहरांना झोडपून काढले. दुपारी ३ नंतर पावसाचा जोर वाढला. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिली. सांगली जिल्ह्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर असाच राहणार आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाचा मुक्काम लांबणार असल्याचे दिसत आहे.
चौकट
गणरायाच्या आगमनालाही पाऊस
येत्या १० सप्टेंबरला सर्वत्र गणरायाचे आगमन होत आहे. त्यादिवशीही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यादिवशी पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस असणार आहे.