खानापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:19+5:302021-05-09T04:27:19+5:30
या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. या पावसाने नुकसान कमी, फायदा जादा होणार आहे. दुपारी ...

खानापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. या पावसाने नुकसान कमी, फायदा जादा होणार आहे. दुपारी पावणेचार वाजता सुरू झालेला पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता. खानापूर, तामखडी, बलवडी (खा), भिवघाट, बेणापूर, सुलतानगादे, मोही, शेडगेवाडी, पोसेवाडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.
मात्र सध्याच्या पावसाने द्राक्ष शेतीचे नुकसान होणार आहे. पावसाने नवीन बागेची पाने फाटत आहेत. भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. मे महिन्याचे कडक ऊन बागांना मिळत नसल्याने बागेची कुचंबणा होत आहे. याचा परिणाम पुढील हंगामावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, आजच्या पावसाने खानापूर येथे सुरू असलेल्या जुन्या पेठेतील रस्त्याच्या व पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे काम थांबून सर्वत्र चिखल झाला आहे. पाइपलाइन पुरण्यासाठी काढलेल्या खोल चरीत पाणी साचले आहे. यामुळे अगोदरच दोन तीन दिवस बंद असलेला पाणीपुरवठा अजून काही दिवस बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना रस्त्याबरोबर पाण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागणार आहे.