आटपाडी तालुक्यात अतिअवजड डंपर वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:22+5:302021-08-14T04:31:22+5:30
करगणी : आटपाडी तालुक्यातून सुरू असणाऱ्या अतिअवजड डंपर वाहतुकीवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आटपाडी ...

आटपाडी तालुक्यात अतिअवजड डंपर वाहतूक
करगणी : आटपाडी तालुक्यातून सुरू असणाऱ्या अतिअवजड डंपर वाहतुकीवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आटपाडी वाहतूक सेनेचे अध्यक्ष दाजीराम खिलारी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन उपप्रादेशिक अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी कृषी सेलचे प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
आटपाडी तालुक्यात अतिअवजड वाहतूक करणारे डंपर अतिशय वेगाने जातात. त्या डंपरला क्लिनरही नसतो. परिणामी डंपर चालकाला वाहन चालवणे अनेक अडथळ्याचे ठरते. महामार्गासाठी खडी, डस्ट, वाहतूक करत असताना त्या डंपरची वाहतूक क्षमता १९ ते २२ टनाची असताना ते डंपर ४० ते ४५ टनानी वाहतात. यामुळे दुचाकी वाहनधारकाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याची उपप्रादेशिक विभागाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.