शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Sangli: रासायनिक वायूमुळे समडोळी, कवठेपिरानमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका

By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2023 16:41 IST

उग्र वासाने नागरिक हैराण, प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष 

समडोळी : लक्ष्मी फाट्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मिरज तालुक्यातील समडोळी, कवठेपिरान रस्त्यालगतच्या एका खासगी कारखान्यातून हवेत पसरत असलेल्या रासायनिक वायूमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खासगी कारखान्याच्या प्रदुषणाकडे प्रदुषण विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार आहे, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.याप्रश्नी संबंधित कारखानदारांवर कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे समडोळी व परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. याच कारखान्यातून यापूर्वी चरखुदाईद्वारे रासायनिक प्रक्रियायुक्त पाणी शेती क्षेत्रात सोडण्यात येत होते. सध्या कारखान्यातून गॅससदृश्य वायू परिसरात पसरत चालल्याने या भागातील शेतकरी वाहनधारकांना श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.समडोळी रस्त्यावरील मनपाच्या कचरा डेपोतील ढिगांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आग लावण्याचे प्रकार घडतात. हा प्रश्न डोकेदुखीचा ठरू पाहत आहे. तशातच या परिसरातील एका कारखान्यातून गॅससदृश्य पसरत चाललेला वायूमुळे नजीकच्या काळात हवा प्रदूषणाचा प्रश्न जटिल बनण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने या प्रश्नावर तातडीने कारवाईची पावले उचलण्याची मागणी होत आहे.

उग्र वासाने नागरिक हैराणलक्ष्मी फाट्यानजीकच्या एका कारखान्यातून गॅससदृश वायू बाहेर सोडला जातो. त्याच्या उग्र वासाने शेतकरी, वाहनधारक हैराण झाले आहेत. कचरा डेपोवरील धुराच्या समस्येला आता कुठे पूर्णविराम मिळाला आहे; परंतु गॅससदृश वायूच्या वासाने श्वसनाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीpollutionप्रदूषण