विश्वासराव नाईक कारखान्यात कर्मचाऱ्यांची आजपासून आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:13+5:302021-06-23T04:18:13+5:30
शिराळा : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर दि. ...

विश्वासराव नाईक कारखान्यात कर्मचाऱ्यांची आजपासून आरोग्य तपासणी
शिराळा : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर दि. २३ व २४ जून रोजी; तर दि. २५ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, २६ जून रोजी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कारखान्याने कर्मचारी आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या दोन्ही शिबिरांचे उद्घाटन जिल्हा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते होणार आहे. दि. २३ जून रोजी कारखान्यातील इंजिनिअरिंग, को-जनरेशन व उत्पादन विभाग; तर २४ जून रोजी प्रशासन, अकौंट्स डिस्टिलरी, पर्यावरण या विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होईल. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू नसल्याने जे हंगामी कर्मचारी कामावर हजर नाहीत, त्यांनीही या शिबिरात सहभागी होऊन सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत आरोग्य तपासणी करून घ्यावी. २५ जून रोजी रक्तदान शिबिर सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे. यावेळी कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटना उपाध्यक्ष विजय पाटील सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.