वांगी येथे आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:42+5:302021-03-13T04:48:42+5:30

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावर जागतिक महिला दिनानिमित्त ऊस तोडणी करणाऱ्या ...

Health check-up camp at Wangi | वांगी येथे आरोग्य तपासणी शिबिर

वांगी येथे आरोग्य तपासणी शिबिर

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावर जागतिक महिला दिनानिमित्त ऊस तोडणी करणाऱ्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई कदम, सहा. जिल्हाधिकारी आयुषी सिंह, तहसीदार डॉ. शैलजा पाटील, दिग्विजय कदम उपस्थित होते.

वैशालीताई कदम म्हणाल्या की, महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून सोनहिरा साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहिते वडगाव यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर घेऊन, मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. दिवस-रात्र काबाडकष्ट करणाऱ्या ऊस तोडणी मजूर महिला स्वत:च्या आरोग्याची व कुटुंबाची योग्यप्रकारे स्वच्छता ठेवू शकत नाहीत. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणून महिलांनी न लाजता नि:संकोचपणे मासिक धर्म कालावधीत स्वच्छ सॅनिटरी पॅडचा वापर करावा.

या शिबिराचे आयोजन दिग्विजय कदम यांनी केले. यावेळी मोहिते वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सागर जाधव, सीमा जाधव, मंजुश्री जाधव, राणी झांबरे, वैभव जाधव, सयाजी जाधव, शिवाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Health check-up camp at Wangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.