जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे सुसज्ज करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:17+5:302021-01-18T04:24:17+5:30
शिरटे : जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज करणे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम यापुढील काळात हाती घेणार आहे, ...

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे सुसज्ज करणार
शिरटे : जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज करणे हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम यापुढील काळात हाती घेणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष बी.डी. पवार होते.
जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकटात अल्पशा पगारावर काम करणा-या आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका यांचे कार्य मोलाचे आहे. गावात आरोग्य केंद्राचे महत्त्व लोकांना आता पटले आहे. म्हणूनच गावातील लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे.
बी.डी. पवार म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी विकासाचा पाया रचला आहे. त्यांचा समर्थपणे वारसा त्यांची तिसरी पिढी प्रतीक व राजवर्धन चालवत आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राजारामबापू दूध संघ अध्यक्ष विनायकराव पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, माजी अध्यक्ष संजय पाटील, भैरवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपराव मोरे, जि.प. सदस्य धनाजी बिरमुळे, कृष्णाचे संचालक सुजित मोरे, बाजार समितीचे माजी सदस्य शंकर गावडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.
संग्रामसिंह पाटील, सुनीता वाकळे, उपसरपंच निलेश पवार, ॲड. उमेश कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत मोरे यांनी आभार मानले.
फोटो-१७शिरटे१
फोटो ओळ : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे धनाजी बिरमुळे, भगवान कोळेकर यांच्या हस्ते मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयवंत मोरे, सुजित मोरे, बी.डी. पवार, निलेश पवार, दिलीपराव मोरे उपस्थित होते.