पलुस तालुक्यात राष्ट्रवादीकडुन आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST2021-07-29T04:26:55+5:302021-07-29T04:26:55+5:30

ओळ : पुनदी (ता.पलूस) येथे वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आले. पलूस : ...

Health camp from NCP in Palus taluka | पलुस तालुक्यात राष्ट्रवादीकडुन आरोग्य शिबिर

पलुस तालुक्यात राष्ट्रवादीकडुन आरोग्य शिबिर

ओळ : पुनदी (ता.पलूस) येथे वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आले.

पलूस : पुरपट्ट्यातील गावांमध्ये पूर ओसरत असताना रोगराई पसरू नये, यासाठी आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने तालुक्यातील दह्यारी, तुपारी, दुधोंडी, नागराळे, पुनदी, आमनापूर, माळवाडी, भिलवडी, बुरुंगवडी, बुर्ली या गावांत वैद्यकीय शिबिरे घेण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन युवक राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या हस्ते झाले.

यावेळी शरद लाड म्हणाले, पूरपट्ट्यात ज्यांना प्राथमिक उपचाराची आवश्यकता आहे, ते जागेवरच दिले जात आहेत. अत्यवस्थ रुग्णाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे. अशी शिबिरे अंकलखोप, नागठाणे, सूर्यगाव, संतगाव, सुखवाडी, चोपडेवडी, ब्रह्मनाळ, खटाव या गावांमध्येही आयोजित केली आहेत.

या आरोग्यसेवेत राष्ट्रवादी डॉ.सेलचे राज्य समन्वयक डॉ.शिवदीप उंद्रे, डॉ.लालासाहेब गायकवाड, पुणे जिल्हा सरचिटणीस डॉ.राजेंद्र डिंबळे, डॉ.अविनाश घाडगे, संदीप मुळीक, पवन नलवडे, संमेद चौगुले, दिनेश सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी यांच्यासह पलूस तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते याेगदान देत आहेत.

280721\img-20210727-wa0010.jpg

आरोग्य शिबीर मोहीम फोटो

Web Title: Health camp from NCP in Palus taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.