मुख्याध्यापक शिवाजी भाेसले यांची आज सेवानिवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:19+5:302021-06-30T04:17:19+5:30

फोटो-२९०६२०२१-आयएसएलएम-शिवाजी भाेसले लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर ...

Headmaster Shivaji Bhasle retires today | मुख्याध्यापक शिवाजी भाेसले यांची आज सेवानिवृत्ती

मुख्याध्यापक शिवाजी भाेसले यांची आज सेवानिवृत्ती

फोटो-२९०६२०२१-आयएसएलएम-शिवाजी भाेसले

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : येथील हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शिराळा या विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी शंकर भाेसले ३१ वर्षे दहा महिने अशा प्रदीर्घ सेवेनंतर ३० जून २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिराळा येथून १४ ऑगस्ट १९८९ पासून केली. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक, कांदे येथे झाले. तर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी संस्थेच्या समाज विकास विद्यालय, सागाव या ठिकाणी प्रवेश घेतला.

पुढे वारणा महाविद्यालय वारणानगर येथून त्यांनी १९८५ साली बी.एस्सी. पदवी संपादन केली. तर आचार्य जावडेकर अध्यापक महाविद्यालय, गारगोटी या ठिकाणी त्यांनी बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या एकूण सेवेमध्ये त्यांनी चोवीस वर्षे साहाय्यक शिक्षक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल, शिराळा येथे विज्ञान आणि गणित या विषयांचे अध्यापन केले. तसेच २० वर्षे त्यांनी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन केले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये विज्ञान प्रदर्शनात तालुकास्तरावर सलग तीन वर्षे न्यू इंग्लिश स्कूलला जनरल चॅम्पियनशिप प्राप्त झाली. त्याचबरोबर तालुका, जिल्हा, राज्य स्तरापर्यंत क्रीडा, वक्तृत्व व विज्ञान प्रदर्शन यासारख्या विभागात विद्यालयाला उत्तुंग यश मिळाले. एस.एस.सी., एच.एस.सी., एलिमेंटरी, इंटरमिजिएट या सर्व परीक्षांच्या निकालवाढीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेचा नावलौकिक, गुणवत्ता व शिस्त टिकवून ठेवण्यामध्ये ते मुख्याध्यापक म्हणून यशस्वी झाले आहेत. सर्वांना सोबत घेऊन काम करणारे असे हे मनमिळावू मुख्याध्यापक सेवानिवृत्त होत आहेत.

Web Title: Headmaster Shivaji Bhasle retires today